महाराष्ट्रात नवा Trend! अंगाला सिल्वर पेंट लावून लहान मुलांना भीक मागायला लावलं

अंगाला सिल्व्हर पेंट लावून मुलांना भीक मागायला लावली Children were made to beg after having silver paint applied to their bodies. सणासुदीच्या गर्दीचा फायदा घेऊन सध्या राज्यात एक नवा प्रकार समोर आला आहे. लहान मुलांच्या संपूर्ण अंगाला सिल्वर रंग लावून त्यांना पुतळ्यासारखं उभं करून भीक मागवण्याचा ट्रेंड सुरू झाला असून, या विरोधात महाराष्ट्रातील पहिली कारवाई लालबागमध्ये करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एक महिला दोन लहान मुलांना घेऊन उभी होती. दोन्ही मुलांच्या संपूर्ण अंगाला सिल्वर रंग लावून वेशभूषा केलेली होती आणि ती महिला गणपती पाहण्यासाठी आलेल्या भाविकांकडे त्यांना दाखवून भीक मागत होती. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन काळाचौकी पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली.

संबंधित व्हिडीओ