Akola Rada | अकोल्यात दोन गटात राडा, दगडफेकीत वाहनांचं नुकसान; पोलिसांचा चोख बंदोबस्त
Clash between two groups in Akola; vehicles damaged in stone-pelting; tight police security in place.
अकोल्याच्या जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीतील हरिअर पेठ 'चांद खा प्लॉट' परिसरात एकाच समुदायाच्या दोन गटांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाल्याची घटना आज सोमवारी मध्यरात्री समोर आलीय.. या वादानंतर दोन्ही गट आमने-सामने आले आणि त्यांच्यात तुफान दगडफेक झाली. या दगडफेकीच्या घटनेत ३ ते ४ दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. तर घराला आग लावण्याचाही प्रयत्न झाल्याची माहिती एका व्यक्तीने दिली.