Nitin Gadkari | 'बायको जर ठीक नसेल तर...' केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं वक्तव्य चर्चेत

Nitin Gadkari | 'बायको जर ठीक नसेल तर...' केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं वक्तव्य चर्चेत If the wife isn't happy Union Minister Nitin Gadkari's statement sparks discussion बायको जर ठीक नसेल तर माणूस कितीही कर्तृत्वान असो,तो राजकारणात,समाजकारणात आणि व्यवसायात यशस्वी होऊ शकत नाही असे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. माजी विधान परिषद सदस्य अनिल सोले यांच्या ६७ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात गडकरी बोलत होते. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. "माझे लग्न झाले त्यावेळी माझ्याकडे शंभर-दीडशे कप चहा व्हायचा, यावर माझ्या बायकोने विचारले की मला बायको म्हणून आणले की मोलकरीण म्हणून?" असा किस्साही त्यांनी सांगितला.

संबंधित व्हिडीओ