Akola Farm Loss | अकोल्यात सोयाबीनच्या पिकाचं नुकसान, संतप्त शेतकऱ्याने पिकाला लावली आग | NDTV
Soybean crop damaged in Akola; angry farmer sets crop on fire.
अकोल्याच्या बार्शीटाकळी तालुक्यातील राजंदा गावात खरीपाच्या तोंडाशी आलेले सोयाबीन पीक हातातून गेल्याने हवालदिल झालेल्या एका शेतकऱ्याने उभ्या पिकाला आग लावून जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान, राजंदा येथील पूर्णाजी मुंढे या अल्पभूधारक 2 एकर शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबीनच्या शेंगा भरल्याच नसल्याने लाख रुपयांचा खर्च वाया गेला असून, यामुळे शेतकरी तीव्र चिंतेत आहे. तातडीने पिकाची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याची वेळ येईल, अशी आर्त हाक या शेतकऱ्याने व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे.