Pune Cyber Case | पुण्यात सायबर चोरट्यांचा धुमाकूळ, 18 महिन्यात तब्बल 136 गुन्ह्यांची नोंद
Cyber thieves on the rampage in Pune; a staggering 136 cases registered in 18 months.
पुण्यात डिजिटल अरेस्टच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकांची मोठी आर्थिक फसवणूक होत आहे. १८ महिन्यांत १३६ गुन्हे दाखल झाले असून, १०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम लुटण्यात आली. २०२५ मध्ये ८५ गुन्ह्यांत ५३ कोटी ५२ लाख, तर यंदा जुलैअखेर ५१ गुन्ह्यांत ४६ कोटी २७ लाखांची फसवणूक झाली. सीबीआय, पोलीस, ईडी अधिकारी असल्याचे भासवून अटकेची धमकी दिली जाते.