मंत्री दादा भुसे यांनी राज ठाकरे यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनासंदर्भात शिंदे सरकारने उचललेली अनेक पाऊले त्यांनी स्पष्ट केली. १० टक्के आरक्षण, आंदोलन काळात निधन झालेल्यांच्या कुटुंबीयांना मदत आणि नोकरी, तसेच कर्ज मर्यादेत वाढ अशा अनेक निर्णयांची त्यांनी माहिती दिली. सरकार मराठा समाजाच्या प्रश्नावर सकारात्मकपणे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.