मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाने नागपूरमधील संविधान चौकात साखळी उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी विविध पक्षांच्या आमदारांनी आणि नेत्यांनी आंदोलनस्थळी येऊन पाठिंबा दिला. सरकारने ओबीसी आरक्षणाला धक्का लावल्यास बेमुदत उपोषण आणि गरज पडल्यास मुंबईला मोर्चा काढण्याचा इशारा ओबीसी महासंघाने दिला आहे.