राष्ट्रीय ओबीसी महासंघाने नागपुरात साखळी उपोषण सुरू केले आहे. मराठ्यांना ओबीसीमध्ये आरक्षण देण्यास विरोध करत महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी सरकारला गंभीर इशारा दिला आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावण्याचा प्रयत्न झाल्यास मुंबईत येऊन तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.