अखेर १६ महिन्यांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प यांची भेट झाली. फ्रान्सच्या एव्हियानमध्ये जी सेव्हन शिखर परिषदेसाठी आलेल्या दोन्ही नेत्यांनी एकमेकांची भेट घेतली द्विपक्षीय बैठकही झाली. यावेळी पंतप्रधान मोदींनी होर्मुझमधील भारतीय खलाशांच्या मृत्यूबाबात चिंता व्यक्त केली. आता इराणसोबतच्या करारामुळे भारतीयांची सुरक्षा सुनिश्चित होईल अशी आशाही पंतप्रधानांनी व्यक्त केली. तर यावेळी डॉनल्ड ट्रम्प यांनी आम्ही चांगले मित्र असल्याचं सांगितलं.भारत अमेरिकेत मोठी गुंतवणूक करत असल्याचंही ते म्हणाले. दोघांमध्ये व्यापार, महत्त्वाची भागीदारी आणि प्रादेशिक स्थैर्याबाबत चर्चा झाली.दरम्यान यावेळी होर्मुझच्या सामुद्रधुनीत भारतीय खलाशांचा मृत्यू झाल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.