भाजप नेत्या नवनीत राणा यांना निष्कासित करा अशी मागणी अमरावती मधील पराभूत उमेदवारांकडून करण्यात आली आहे. अमरावतीत नवीनीत राणांनी युवा स्वाभिमानच्या उमेदवारांसाठी प्रचार केल्याचा 22 पराभूत उमेदवारांचा आरोप आहे.आणि राणांनी केलेल्या प्रचारामुळे भाजपचे उमेदवार पराभूत झाल्याचं पत्रात नमूद करण्यात आलं आहे....मात्र आता भाजप काय कारवाई करणार याकडे पाहावं लागणार. नवीनत राणा यांच्याविरोधात करण्यात आळेल्या तक्रारीवर चंद्रशेखल बावनकुळेंनी स्पष्टीकरण दिलं आहे....ते म्हणालेत की, निवडणूक प्रचाराचं विश्लेषण करावं लागेल कुणी विरोधात काम केलं याच्या तपासणीसाठी एक टीम अमरावतीत पाठवू आणि त्यानंतर विश्लेषण करू अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.