धाराशिव जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी,... या प्रमुख मागणीसाठी येडशी येथे शेतकऱ्यांनी तीव्र रास्ता रोको आंदोलन छेडलेय... शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनामुळे सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झालीये..., दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत... सोयाबीन आणि इतर खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
Dharashiv | Farmers stage a 'rasta roko' (road blockade) in Yedshi, demanding a drought declaration and financial aid of ₹50,000 per hectare.