धारावी एक्सपिरिअन्स सेंटरमध्ये रहिवाशांसाठी प्रत्यक्ष आकाराचा सॅम्पल फ्लॅट उभारण्यात आले आहेत. यामध्ये ३५० चौरस फूट आणि ५०० चौरस फुटांच्या फ्लॅटचं सॅम्पलं. ही घरं पूर्णपणे सुसज्ज म्हणजे फुल्ली फर्निश्ड आहेत.. ३५० चौरस फुटाच्या या घरामध्ये प्रशस्त हॉल, कॉमन टॉयलेट बाथरुम तसंच एक बेडरुम आणि त्याला अटॅच्ड टॉयलेट बाथरुम असणार आहे. धारावीकरांना आपल्या भविष्यातल्या घरातली मोकळी जागा, खोल्यांची रचना आणि अंतर्गत लेआऊट या सॅम्पल फ्लॅटद्वारे प्रत्यक्ष पाहता येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही धारावीकरांना मिळणाऱ्या सॅम्पल फ्लॅटची पाहणी केली.. पुनर्विकासामुळे धारावीकरांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावण्यास मोठी मदत होणार आहे.. धारावी एक्सपिरिअन्स सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे, अदाणी नवभारत डेव्हलपर्स प्रा. लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सरदाना, अदाणी समूहाचे व्यवस्थापकीय संचालक प्रणव अदाणी आदी उपस्थित होते.