Akola मध्ये 7 दिवसांत 4 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन; दुष्काळ जाहीर, तरीही शेतकऱ्यांच्या अडचणी कायम

एकीकडे महाराष्ट्रत दुष्काळ जाहीर झाला मात्र दुसरीकडे अकोल्यात शेतकऱ्यांनी स्वतः आयुष्य संपवलं आहे. गेल्या सात दिवसांत चार तालुक्यांतील चार शेतकऱ्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे.सुकोडा येथील 26 वर्षीय संतोष नेमाडे यांच्याकडे दीड ते दोन एकर शेती असून, गेल्या दोन-तीन दिवसांपासून ते तणावात असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. आज सकाळी संतोष नेमाडे यांनी विहिरीत उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपवलं. शासनाने घोषणा न करता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करावी, अन्यथा शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

संबंधित व्हिडीओ