मंत्री भरत गोगावले यांनी राज ठाकरे यांच्यावर पलटवार करत, 'महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नका,' असा इशारा दिला आहे. मनोज जरांगे पुन्हा का आले, हे एकनाथ शिंदेच सांगू शकतील, या राज ठाकरे यांच्या विधानावर ते बोलत होते. जरांगे यांनी सरकारला दिलेली चार महिन्यांची मुदत संपल्यानेच ते परत आले आहेत, यामागे कोणताही वैयक्तिक स्वार्थ नाही, असे गोगावले यांनी स्पष्ट केले. तसेच, एकनाथ शिंदे यांच्यावर केलेला आरोप चुकीचा असल्याचेही त्यांनी म्हटले.