मुंबईतील सुप्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिरात आज ड्रेस कोड लागू करण्यात आलां आहे. ड्रेस कोड संदर्भात सिद्धीविनायक मंदिर न्यासाने या संदर्भात अधिकृत पत्रक प्रसिद्ध केलंय.नागरिकांना संकोच वाटणार नाही असे कपडे भाविकांनी परिधान करावे. मंदिरात येणाऱ्या भाविकांनी आता भारतीय पारंपारिक वेशभूषा किंवा अंगभर कपडे घातले तरच त्यांना दर्शनासाठी प्रवेश देण्यात येणार असल्याचं पत्र मंदिर न्यासाकडून प्रसिद्ध करण्यात आलंय.