पालघरमधले शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी बेपत्ता प्रकरणात एक खळबळजनक घटना घडलीय.या प्रकरणात पोलिसांनी अशोक धोडी यांचा सख्खा भाऊ अविनाश धोडीला ताब्यात घेतलं होतं.पण मंगळवारी रात्री अविनाश धोडी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला.अविनाश धोडी याच्यावर संशय का होता आणि तोच मुख्य संशयित आरोपी असताना पोलिसांच्या तावडीतून पळाल्यानं पोलीस करतायत तरी काय, असा प्रश्न विचारला जातोय.