तुमच्या गल्लीतील रस्त्यावर भगदाड पडलं, सोसायटीतल्या नळाला अचानकपणे कमी दाबाने पाणीपुरवठा व्हायला लागला, घरासमोरचा कचरा दहा दिवस उचलला नाही, गावातल्या वाडीसमोर गटार तुंबलं.तर तुम्ही कुणाकडे तक्रार करता. एकतर नगरसेवकाकडे नाहीतर पंचयात समितीच्या सदस्याकडे पण वर्षानुवर्षे जर तुम्हाला नगरसेवकच मिळाला नाही, तुमच्या शहराचं महापौरपदच रिकामं असेल, पंचायत समितीला सदस्यच नसतील तर तुम्ही काय कराल.तुमच्याकडे वेळ असेल तर सरकारी कार्यालयात जाल नाहीतर गुमान आहे तशा सेवा स्वीकारत रहाल.गेली पाच वर्ष अनेक महापालिकांमध्ये तुम्ही हेच तर करताय.आणि अजूनही काही महिने तुम्हाला तेच करावं लागू शकतं.कारण किमान पावसाळ्याआधी तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होण्याची शक्यता आता जवळपास मावळलीय.