दक्षिण सुदानमध्ये विमानाचा भीषण अपघात झालाय. या अपघातात २० जणांचा मृत्यू झालाय.मृतांमध्ये एका भारतीय नागरिकाचा समावेश आहे. विमानात क्रू मेंबर्ससर २१ जण होते.अपघात झाला तेव्हा विमान युनिटी ऑइलफील्ड विमानतळावरून राजधानी जुबाकडे उड्डाण करत होते.युनिटी राज्याचे माहिती मंत्री गटवेच बिपल यांनी अपघाताच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.या विमानात ग्रेटर पायोनियर ऑपरेटिंग कंपनीशी संबंधित तेल क्षेत्रातील कर्मचारी होते.ही कंपनी चायना नॅशनल पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि नाईल पेट्रोलियम कॉर्पोरेशन यांच्या सहकार्याने काम करते.मृतांमध्ये दोन चिनी नागरिकांचाही समावेश आहे. अपघाताचं कारण अद्याप कळलेलं नाही.