राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होऊन आता महिनाभराहून अधिकचा काळ लोटलाय.तीन प्रमूख पक्षांमध्ये मंत्रीपदाचं वाटप झालंय, खाते वाटप झालंय पालकमंत्रीपदाचं वाटपही झालंय. नव्या सरकारच्या मार्गदर्शनात सरकारी कामंही हळूहळू सुरू होऊ लागलीत.पण सरकारमध्ये सगळं आलबेल नाही याची चिन्हं आता स्पष्ट व्हायला लागलीत.एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये ज्या ज्या योजनांशी आणि घटनांशी एकनाथ शिंदे यांचं नाव ठळकपणे जोडलं गेलं होतं त्यांचा प्रभाव हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न होतोय का अशीही शंका व्यक्त होऊ लागलीय.दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदावरून शिंदेंसेनेला आक्रमक भुमिका घ्यावी लागतेय.. त्यामुळे शिंदेंची नाराजी लपता लपत नाहीय.त्यातच चार मंत्र्यांसह शिंदेनी मंत्रीमंडळाच्या बैठकीला दांडी मारली त्यामुळे नाराजीच्या चर्चा आता उघडपणे होऊ लागल्यात.