Shinde-BJP मधला नवा वाद चव्हाट्यावर,श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघातील गावांना गणेश नाईकांचा नकार

शिंदे आणि भाजपमधला एक वाद नुकताच चव्हाट्यावर आलाय.श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघातील 14 गावं नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्याला गणेश नाईकांनी विरोध केलाय.त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत पत्र पाठवलं.१४ गावांच्या समावेशामुळे नवी मुंबई महापालिकेवर 6 हजार कोटी रुपयांच्या आर्थिक भार पडणार असल्याचे नाईक यांचे म्हणणे आहे. या गावांच्या विकासाचा भार नवी मुंबईकर करदात्यांनी का सोसावा, असा सवाल पत्रात करण्यात आला आहे.

संबंधित व्हिडीओ