सायबर फ्रॉडचे वेगवेगळे प्रकार आपण पाहिलेत.मात्र नाशिकमध्ये एक धक्कादायक प्रकार सुरू होता.एका बंगल्यामध्ये अवैधरित्या कॉल सेंटर चालवलं जातं होतं.त्या कॉल सेंटरमधून चक्क अमेरिकेतल्या नागरिकांना गंडा घातला जात होता.गेल्या दोन वर्षांपासून बिनदिक्कत हा प्रकार सुरू होता.यामध्ये शेकडो अमेरिकन नागरिकांची फसवणूक झाल्याचं उघड झालंय.