15 महिन्यांच्या इस्त्रायल- हमास युद्धाला विराम लागला खरा, मात्र, खरं संकट तर आता सुरु झालंय. पूर्वी सुंदर टोलेजंग इमारती असलेली गाझापट्टी आता फक्त उजाड संसारांचं प्रतिक बनली.अन्नपाण्या सारख्या प्राथमिक गरजाही इथे परतलेल्या नागरिकांच्या पूर्ण होत नाहीत.त्यामुळे कोसळलेल्या इमारतींच्या ढीगाऱ्यावर बसून उजाड भविष्याचा विचार करण्यापलीकडे गाझा मध्यल्या नागरिकांना काही पर्याय राहिला नाही.