देशातील सर्वात घातक नक्षलवादी कमांडरपैकी एक माडवी हिडमा मारल्या गेल्यानंतर आणखी एक यश मिळालंय. छत्तीसगड-आंध्र प्रदेश सीमेवर सुरक्षा दलांनी सात नक्षलवाद्यांना ठार मारले आहे. यामध्ये तीन महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. या चकमकीत पॉलिटब्युरो सदस्य आणि नक्षलवाद्यांचे सरचिटणीस देवजी यांचाही मृत्यू झाल्याचे वृत्त आलं होतं. मात्र त्याबाबत काहीसा संभ्रम आहे. दरम्यान, . केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशाला नक्षलवाद्याच्या विळख्यातून सोडवण्याचा विडा उचलला आहे आणि सुरक्षा दल ही जबाबदारी समर्थपणे पार पाडताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांत नक्षलवादाचे टॉपचे कमांडर एकतर चकमकीत तरी मारले गेलेत किंवा आत्मसमर्पण करत शरण आलेत. त्यामुळे हळू हळू नक्षली कमकुवत होत चालल्याचं दिसतंय.