पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान पुन्हा एकदा चर्चेत आलेत. सध्या ते तुरुंगात आहेत आणि त्यांना भेटण्यासाठी गेलेल्या त्यांच्या बहिणींना चक्क मारहाण झाल्य़ाचा आरोप होतोय. इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफनं याबाबत सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून माहिती दिलीय. व्हिडिओमध्ये तर त्यांच्या बहिणी प्रचंड भेदरलेल्या दिसत आहेत. इम्रान खान यांना भेटू न दिल्याचा आरोप त्यांच्या बहिणींनी केलाय. आठवड्याची भेटही सरकार नाकारतंय असा दावा केला जातोय. त्यावरून पुन्हा एकदा वाद सुरु झालाय. पाकिस्तान सरकार इम्रान खान यांच्याबाबत इकतं निराग्रही का. त्यांच्या कुटुबीयांच्या भेटीगाठी का टाळल्या जात आहेत. इम्रान खान यांना आणखी किती दिवस तुरुंगात डांबलं जाणार आहे. काय घडतंय पाकिस्तानात.. इम्रान खान यांच्या अटकेवेळी जसं आंदोलन पेटलं तसंच स्फोटक वातावरण तयार होणार का... पाहूया एक रिपोर्ट....