Gujarat| गांधीनगरमध्ये बांधकामादरम्यान मोठी दुर्घटना, इमारतीचा काही भाग कोसळल्याने मजूर अडकले

गांधीनगरमधील कुडासन परिसरात सुरू असलेल्या बांधकामादरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. एका बांधकामाधीन इमारतीचा काही भाग कोसळल्याने अनेक मजूर ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.आतापर्यंत १२ मजुरांना ढिगाऱ्यातून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असून त्यांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. या सर्वांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, अद्याप १० ते १५ मजूर मलब्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जातेय. प्राथमिक माहितीनुसार, बांधकामादरम्यान क्रेन कोसळल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज आहे. इमारतीच्या स्लॅबचे काम सुरू असतानाच ही घटना घडली. घटनास्थळी अग्निशमन दल आणि बचाव पथके युद्धपातळीवर मदत व बचावकार्य करत आहेत. दरम्यान, गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांनीही घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.

संबंधित व्हिडीओ