राज्यभरात उन्हाचा चटका जाणवत आहे. मराठवाड्यात देखील प्रचंड उकडा जाणवत आहे... अशात माणसांप्रमाणे प्राण्यांना देखील उन्हाचा त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे छत्रपती संभाजी नगरच्या सिद्धार्थ उद्यानात प्राण्यांसाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहे. उन्हाचा सर्वाधिक त्रास वाघ आणि बिबट्यांना होत असल्यामुळे त्यांच्या पिंजऱ्यांच्या बाजूला कुलर लावण्यात आले आहे. हे कुलर 24 तास सुरू असतात. सोबतच दिवसातून तीन ते चार वेळेस प्राण्यांच्या अंगावर पाण्याचा फवारा मारला जातो.