राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर सडकून टीका केली आहे. "माझा प्रॉब्लेम आहे की मी मंगळसूत्र चोरांच्या विरोधात लढत नाही?", असे म्हणत त्यांनी निशाणा साधला. सांगलीतील मुस्लिम आणि ख्रिश्चन परिषदेत बोलताना त्यांनी हे सरकार मतचोरी करून सत्तेत आल्याचा आरोप करत लोकशाहीवर हल्ला झाल्याचे म्हटले.