साहिलच्या कुटुंबीयांनी या संपूर्ण प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. सीबीआय चौकशीद्वारे साहिलच्या मृत्यूमागील सत्य समोर येऊन न्याय मिळेल, असा विश्वास कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. साहिलच्या आजी श्यामलता तायडे यांनीही सीबीआय चौकशीची मागणी करत, या प्रकरणात जातीय भेदभावाचा संशय असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात पुढील तपासाची दिशा काय असेल आणि कुटुंबीयांच्या मागणीवर काय निर्णय होतो, याकडे आता लक्ष लागलं आहे.
IIT Bombay | Sahil's family demands CBI inquiry; family suspects caste-based discrimination.