लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेली पवित्र इंद्रायणी नदी आज पुन्हा एकदा फेसाळली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नदीच्या प्रदूषणात वाढ होते. वारंवार याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा करून देखील परिस्थिती जैसे थेच असल्यानं वारकरी बांधवांमध्ये नाराजीचा सूर आहे.