अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या श्री खंडोबा गडावर नववर्षानिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. राज्यभरातून भाविक हे खंडेरायाचं दर्शन घेण्यासाठी जेजुरीत दाखल झाले आहेत. येळकोट येळकोट जय मल्हार या जयघोषानं खंडोबा जेजुरी गड दुमदुमून केलाय.