उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आई आशाताई पवार यांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पंढरपुरात जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेतलंय. माझ्या दादाला सर्वांना नववर्ष चांगलं सुखी जाऊदे. घरातील सगळे वाद संपू देत असं साकडं त्यांनी विठुरायाला घातलंय. आणि त्यामुळे अप्रत्यक्षपणे त्यांनीही दोन्ही पवार एकत्र यावेत अशी मनोकामना व्यक्त केली आहे. अजित पवारांच्या आईनं विठ्ठलाचं दर्शन घेतलंय.