छत्रपती संभाजीनगरमधील एका शाळेत रेडा घुसल्यानं शाळेतले विद्यार्थी जखमी झालेत. जुबली पार्क परिसरातल्या मॉडर्न स्कूल मध्ये मधल्या सुट्टीत विद्यार्थी बाहेर आले होते. आणि त्यावेळी एका रेड्यानं दोन तीन जणांना धडक दिली आणि त्यानंतर एकच गोंधळ उडाला. यामध्ये पंधरा विद्यार्थी जखमी झाले आहेत. दरम्यान या जखमी विद्यार्थ्यांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.