Ind Vs Pak| ...तर भारत आणि पाकिस्तान युद्ध होणार, पाकचे माजी मंत्री बिलावल भुट्टोंची धमकी | NDTV

भारताने जर सिंधू पाणी करार रद्द केला आणि सिंधू नदीवर धरण बांधण्याचा प्रयत्न केला तर दोन्ही देशांमध्ये युद्ध होणार, अशी धमकी पाकिस्तानचे माजी मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी दिली.भारत आणि पाकिस्तानमध्ये गेल्या काही महिन्यांपासून तणावाचे वातावरण आहे. अशातच भुट्टो यांनी युद्धाची पोकळ धमकी भारताला दिली. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर भूमिका घेतलेली आहे.भारताने सिंधू पाणी करार थांबवलेला आहे, त्यामुळे पाकिस्तानातील शेती धोक्यात आली आहे. त्यामुळे पाकिस्तानकडून भारताला पोकळ धमकी दिली जात आहे.

संबंधित व्हिडीओ