मुंबई पालिकेमधील निविदांमध्ये अनियमितता आढळून आली आहे. पालिका आयुक्तांकडनं निविदांचा आढावा सुरू असल्याची बातमी सूत्रांकडून आपल्याला कळते आहे आणि जर घोटाळा आढळला तर कारवाई होणार अशी माहिती देखील सूत्रांकडून मिळते आहे. अनियमितता झालेल्या निविदांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे अनेक कंत्राटदार असल्याची चर्चा आहे.