माणिकराव कोकाटेंच्या Nashik जिल्ह्यातच एक मोठा युरिया घोटाळा समोर, NDTV मराठीने घेतलेला आढावा

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नाशिक जिल्ह्यातच एक मोठा युरिया घोटाळा समोर आल्याने खळबळ उडाली आहे. केंद्र शासन अनुदानित शेती उपयोगी नीम कोटेड युरियाचा गैरवापर होत असल्याचा आरोप होतोय.शेतीसाठीच्या युरियाचा वापर थेट औद्योगिक कारणास्तव वापरला जात असल्याचे समोर आले.दिंडोरी तालुक्यातील आशेवाडी परिसरात असलेल्या गोदरेज ऍग्रोवेट या नामांकित कंपनीतून 50 किलो वजनाच्या 1800 गोण्या म्हणजेच 90 मेट्रिक टन माल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे थेट दिल्लीच्या रसायन व खते मंत्रालयाच्या पथकाने गेल्या आठवड्यात हा छापा टाकला असून ही कारवाई अत्यंत गुप्त ठेवण्यात आली होती.दरम्यान ज्या कंपनीत केंद्राच्या पथकाने छापेमारी करत हा साठा जप्त केलाय त्या गोदरेज ऍग्रोव्हेट कंपनीबाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी.

संबंधित व्हिडीओ