मेरठमध्ये पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या निघृण हत्या केल्याच्या घटनेवर बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी चिंता व्यक्त केलीय. त्याचबरोबर फिरकी घेत मिश्किल टिप्पणीही केली. धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, निळा ड्रम देशात व्हायरल होत आहेत. यामुळे पती दहशतीत आहेत. देवाची कृपा आहे की माझं लग्न झालं नाहीय. संस्कारी कुटुंब बनवण्यासाठी रामचरितमानसचा आधार घ्यायला हवा. आयुष्यात कोणीही एकच लग्न करावं.ज्या कुटुंबातील मुलगा किंवा मुलगी असं कृत्य करतायत त्यांच्यावर संस्कार कमी झाले असावेत असं धीरेंद्र शास्त्री म्हणाले.