कोल्हापूर म्हटलं की तांबडा- पांढरा रस्सा असो किंवा महालक्ष्मी मंदिर आपल्याला आठवतं. तसंच आणखी एका वस्तूसाठी कोल्हापूर जिल्हा प्रसिद्ध आहे. सुबक आकार, नक्षीकाम असलेल्या कोल्हापुरी चप्पला खुप प्रसिद्ध आहे.मात्र आता कोल्हापुरी चप्पलांचं अस्तित्व धोक्यात आलंय. बनावट आणि यंत्राने बनवलेल्या कोल्हापुरी चप्पलांच्या प्रतिकृतींनी बाजारपेठेत पूर आलाय.. त्यामुळे सरकारी आर्थिक मदतीशिवाय कोल्हापुरी चपलांना वेळेची झीज सहन करावी लागू शकते, अशी भीती व्यापारी आणि कारागिरांना वाटते.