कुडाळमध्ये माजी आमदार वैभव नाईक यांना मोठा धक्का बसलेला आहे. कुडाळ नगर पंचायतीचे महाविकास आघाडीचे सात नगरसेवक यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे पाच तर काँग्रेसचे दोन असे एकूण सात नगर सेवक यांनी भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला. प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये नगरसेवकांसह अनेकांनी भाजपात प्रवेश केलाय. भाजपाने उद्धव ठाकरे यांच्या सेनेला कुडाळमध्ये मोठं खिंडार पडलेलं आहे त्यामुळे वैभव नाईक यांना हा मोठा धक्का मानला जातोय. बसा. तर कुडाळमध्ये माजी आमदार वैभव नाईक यांना मोठा धक्का बसलेला आहे.