पुण्यातील मावळमध्ये कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. 15 जून रोजी या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला होता तर 30 जण किरकोळ जखमी झाले होते. या दुर्घटनेची जिल्हास्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीचा अहवाल आता समोर आली असून पुणे जिल्हा परिषदेचे (ZP) आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे (PWD) जबाबदारी झटकणे व देखभाल न करणे हे ठपके लावले आहेत.