दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर धाराशिव जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. एक महिन्याच्या विश्रांतीनंतर आलेल्या या पावसामुळे खरिपाच्या पिकांना नवसंजीवनी मिळाली असून, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.