शिंदे गटाचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अनिल परब यांनी गंभीर आरोप केले आहेत. परब यांच्या दाव्यानुसार, कदम यांच्या आईच्या नावावर मुंबईत 'सावली रेस्टॉरंट अँड बार' हा डान्सबार असून, तिथे अश्लील नृत्य सुरू असताना पोलिसांनी छापा टाकला होता. याशिवाय, रत्नागिरीतील जगबुडी नदीतून अवैध वाळू उपसा करून ती कदम यांच्या बहिणीच्या कॉलेजच्या जमिनीवर टाकली जात असल्याचा आरोपही परब यांनी केला.