छत्रपती संभाजीनगर: खासदार संदीपान भुमरे यांचे चालक जावेद शेख यांना आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील दाऊदपुरा येथील कोट्यवधी रुपयांची जमीन सालारजंग कुटुंबाने 'हिबानामा' (भेटपत्र) द्वारे जावेद शेख यांना दिल्याच्या प्रकरणावरून ही नोटीस बजावण्यात आली आहे.