#ManikraoKokate #Sushmaandhare #ndtvmarathi कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या कथित रमी खेळण्याच्या व्हिडिओवरून सुरू असलेल्या वादात आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उडी घेतली आहे. त्यांनी कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करताना, दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या एका जुन्या घटनेचा दाखला दिला आहे.