महाराष्ट्रभरातील जिल्ह्यांमधील १ जून ते १८ ऑगस्ट या कालावधीतील पावसाची स्थिती पाहिली, तर एक चिंतेची बाब समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कमी पावसाचे भाग हळूहळू वाढत चालले आहेत. ऑगस्टच्या सुरुवातीपासून अनेक भागांत पावसाने ओढ दिल्यामुळे पूर्वी समाधानकारक स्थितीत असणारे भाग आता हळूहळू तुटीत जात आहेत. मराठवाड्यातील बीड, हिंगोली, जालना, लातूर, विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा आणि उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाला आहे, असे ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले.