Pimpri-Chinchwad| भटक्या कुत्र्यांच्या त्रासाविरोधात NCP चं श्वानांसह अनोखं आंदोलन

पिंपरी-चिंचवड शहरात भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या आणि नागरिकांवर होणाऱ्या जीवघेण्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतीय.. त्यानंतर आता पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात आलं.. महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीबाहेर तीव्र आंदोलन करण्यात आलं.महापालिकेची सर्वसाधारण सभा सुरू असतानाच आंदोलकांनी पाळीव श्वान सोबत आणून जोरदार घोषणाबाजी केली.. शहरात भटक्या कुत्र्यांचा त्वरित आणि कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा, तसेच या समस्येकडे दुर्लक्ष करणाऱ्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचा तात्काळ राजीनामा घेण्यात यावा, अशी आक्रमक मागणी यावेळी करण्यात आली.

संबंधित व्हिडीओ