Water Crisis|एप्रिलच्या मध्यावर महाराष्ट्रावर पाणीटंचाईचं महासंकट, मराठवाडा-लातूरमधली परिस्थिती काय?

राज्यातील अनेक भागात आता पाणीटंचाई जाणवत आहे. उन्हाचा पारा वाढत असल्याने धरणांमधील पाणीसाठ्यात देखील वेगाने घट होत आहे. एप्रिलच्या मध्यावर महाराष्ट्रावर पाणीटंचाईचे महासंकट ओढवले आहे. गावखेड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. विहिरींनी तळ गाठल्याने पाण्यासाठी अनेक कोस पायपीट करण्याची वेळ लोकांवर आली आहे. त्यांची तहान भागवण्यासाठी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मराठवाड्यात तर आत्तापासूनच काही भागात भीषण पाणीटंचाईचे चटके जाणवत आहेत. मराठवाड्यात असलेल्या सर्व लघु, मध्यम आणि मोठ्या 920 धरणांमध्ये फक्त 37.88 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे आगामी काळात मराठवाड्यावर पाणीटंचाईचे महासंकट पाहायला मिळू शकते.... तिकडे लातूर, वाशिम आणि अकोल्यातही पाणीस्थिती गंभीर झालीए...

संबंधित व्हिडीओ