महात्मा जोतिबा फुले यांची आज १९८ जयंती निम्मित पुण्यातील फुले वाड्यात अनेक जण अभिवादन करण्यासाठी येतात. अनेक राजकीय नेते देखील उपस्थिती लावतात. आज फुले वाड्यात, ज्या वास्तू मध्ये फुले दाम्पत्य वास्तव्यास होते तो वाडा जतन करण्यात आला आहे. तो वाडा नक्की कसा जतन करण्यात आला आहे आणि कस त्यांचे जीवनपट तिकडे दाखवले आहे याचा आढावा घेतलाय फुले वाड्यातून आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी.