प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मोठ्या गणेश मूर्तीचे विसर्जन प्रथेनुसार होण्यासाठी.कोर्टात टिकेल असा अहवाल सादर करावा.मुख्यमंत्र्यांचे निर्देश.30 जूनला यासंदर्भात उच्च न्यायालयात सरकारची बाजू मांडायची आहे. यासाठी उच्च स्तरीय बैठकीत यासंदर्भात चर्चा.मुंबईचे पालकमंत्री आशिष शेलार, राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान समितीचे अध्यक्ष अनिल काकोडकर, महापालिका आयुक्त भूषण गगराणी , महाधिवक्ता वीरेंद्र सराफ या बैठकीला उपस्थित होते.समितीच्या अहवालातील शिफारशींचा अभ्यास करण्याचे निर्देश.पीओपीच्या गाळाचा पुन्हा वापर कसा करता येईल यावर अभ्यास करणे गरजेचे असल्याचे समितीचे म्हणणे.