अतिदुर्गम भाग असलेल्या काकडीआंबा परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने याठिकाणचे नदी नाले तुंडब भरुन वाहत होते. काल दुपारनंतर पावसाचा जोर वाडल्याने सातपुडा पर्वत रांगातील डोंगर दऱयातून येणाऱया नदी नाल्यांनी अक्षरशा रौद्ररुप धारण केले होते. यातील एका नाल्याचे पाणी थेट आदिवासी बांधवांच्या घरात घुसल्यान या गावातील आठ आदिवासी बांधवांच्या घराची पडझड होवून संसार उपयोगी साहीत्याचे देखील नुकसान झाल्याचे चित्र आहे. काल सायंकाळपासूनच पावसाचा जोर ओसरला असून त्यामुळे परिस्थीतीत काहीशी सुधारणा देखील झाल्याचे चित्र आहे.