Chiplun Crime|पतीकडून मारहाण, सासूकडून शिवीगाळ; चिपळूणमध्ये विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल |NDTV मराठी

चिपळूणमध्ये विवाहितेने राहत्या घरी साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन जीवन संपवलं आहे. चिपळूण तालुक्यातील खांदाट-मोरवणे फाटा येथे ही घटना घडली.पतीकडून होणारी मारहाण आणि सासूकडून शिवीगाळ तसेच दमदाटीला कंटाळून तिने टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती मिळतेय. विवाहितेच्या वडिलांनी चिपळूण पोलीस ठाण्यात यासंदर्भात फिर्याद दिली.त्यानुसार पतीसह सासूवर चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शकुंतला अशोक चव्हाण असं विवाहितेचं नाव आहे. तर अशोक मोतीराम चव्हाण, कमलाबाई मोतीराम चव्हाण अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद विनायक जयसिंग राठोड यांनी दिली आहे.

संबंधित व्हिडीओ